१५ मिनिटे बंद दाराआड चर्चा
यावेळी दोन्ही नेत्यांची 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या भेटीने राज्यात कोणतेही नवे राजकीय समीकरण निर्माण होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृहाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांचं ग्रंथालय, अभ्यासाची खोली, त्यांच्या वापरातील वस्तू आणि बाबासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन पाहिले. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या वास्तूत आल्यावर एक वेगळंच समाधान लाभले. इंदू मिल स्मारकाबाबत चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा ‘मेरा अब्दुल ऐसा नही…’ पोस्टवर केतकी चितळेचे प्रत्युत्तर, सोशल मीडियात पोस्ट व्हायरल)
Join Our WhatsApp Community