राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. राज्यातील एसटी (MSRTC) महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी राज्यातील एसटी कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता हा २८ टक्के इतका होता, आता तो २८ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्यात आला आहे.
राज्य सरकारने यासंदर्भातील एक पत्र एसटी (ST) महामंडळाला पाठवले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार असल्याच्या बातमीने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून एसटी कामगार संघटनेने शिंदे सरकारचे आभार मानले आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याला शासनाची अखेर मंजुरी मिळाली असली तरी त्याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून अद्याप कोणतेही अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही.
(हेही वाचा – 8th Pay Commission: आता आठव्या वेतन आयोगाचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेध)
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ३४ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय गेल्या काही दिवसांपासून रखडला होता. या प्रस्तावित भत्त्यावर कोणताही निर्णय होत नसल्याने काही एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र आज, बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community