पुन्हा पाकिस्तानी कलाकार दिसला तर… मनसेचा बाॅलिवूडला इशारा

190

बाॅलिवूड मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वादात आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बाॅलिवूडला इशारा देण्यात आला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीटरवरुन पुन्हा एकदा बाॅलिवूडवर तोफ डागली आहे. मनसे आधीपासूनच बाॅलिवूडमध्ये असलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात आहे. याआधीही मनसेने अनेक वेळा बाॅलिवूडमधील पाकिस्तानी कलाकारांना हाकलून देण्यासाठी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा मनसेने बाॅलिवूडला इशारा दिला आहे.

( हेही वाचा: कोणताही उद्योग राज्याबाहेर १-२ महिन्यात जात नाहीत, ती काय जादूची कांडी आहे का? – मुख्यमंत्र्यांचा घणाघात )

…तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील

मनसे नेते अमेय खोपकर हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असते. ट्वीटच्या माध्यमातून बाॅलिवूड तसेच सिनेसृष्टीत घडणा-या काही घडामोडींवर भाष्य करत असतात. अमेय खोपकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, बाॅलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे, असे कानावर येत आहे. ही प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागेल, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दांत इशारा देत आहोत की, फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील, असे अमेय खोपकरांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.