शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांना ईडीकडून पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे. ईडीने पुन्हा एकदा १८ नोव्हेंबरला चौकशीकरता हजर रहा असे समन्स राऊतांना बजावले आहे.
( हेही वाचा : हिवाळी अधिवेशनाला रेल्वेने जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची होणार गैरसोय?)
दरम्यान, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊतांना विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. परंतु आता याविरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी पीएमएलए न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ईडीकडून सुधारीत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. ईडीच्या या सुधारीत याचिकेवर येत्या २५ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community