नेहरूंच्या गैरकृत्यांचा पुराव्यानिशी रणजित सावरकरांनी केला पर्दाफाश

159

लॉर्ड माउंटबॅटन यांनी देशाची फाळणी करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन, त्यांची पत्नी लेडी माउंट बॅटन आणि मुलगी हे नेहरूंना सिमला येथे घेऊन गेले होते, त्यानंतर नेहरूंनी देशाच्या फाळणीसाठी परवानगी दिली. एका बाईच्या पायी नेहरूंनी कोणाला न विचारता देशाच्या फाळणीला परवानगी दिली आणि २० लाख हिंदूंचे हत्याकांड घडले. नेहरू हे लेडी माउंट बॅटन हयात असेपर्यंत दररोज रात्री त्यांना पत्र लिहून सर्व घडामोडी कळवायचे. म्हणून ब्रिटिशांना हेरगिरीसाठी कोणाची स्वतंत्र नेमणूक करण्याची गरज नव्हती, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी नेहरूंच्या गैरकृत्यांचा पुराव्यानिशी पर्दाफाश केला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील सावरकर सभागृहात ‘वारसा विचारांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर, नेते रामदास कदम, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते राहुल शेवाळे, भाजप नेते प्रसाद लाड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात रणजित सावरकर यांनी हे परखड विचार मांडले.

नेहरूंनी देशाशी गद्दारी केली

वीर सावरकर तुरुंगाबाहेर बाहेर आले, तोवर गांधी सर्वमान्य नेते बनले होते, तेव्हा जगावर दुसऱ्या महायुद्धाचे ढग होते, त्यावेळी ब्रिटिशांना भारत सोडायचा होता, परंतु त्यांना त्याआधी भारताची फाळणी करायची होती. खरेतर ब्रिटिश १९३९ सालीच भारत सोडणार होते, कारण त्यावेळी त्यांनी आयसीएस भरती बंद केली होती, तेव्हा वीर सावरकर यांनी ‘आता अखंड हिंदुस्थान’साठी आंदोलन उभारायचे असे ठरवले आणि हिंदू महासभा मोठा पक्ष म्हणून उभा केला. त्यावेळी महंमद अली जिना जात्यंध बनले होते, तेव्हा महात्मा गांधी त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. हा देशाच्या गद्दारीचा इतिहास आहे. १९२१ साली आयकर भरू नका, शाळा-महाविद्यालयात जाऊ नका, असहकार आंदोलन करा असे नेहरू लोकांना सांगत होते, लोकांनी त्यांचे ऐकले आणि सगळे गमावून बसले, पण दुसरीकडे तेच जवाहरलाल नेहरू तुरुंगातून वडिलांना पत्र लिहून ‘आयकर भरा’ असे सांगत होते, ही गद्दारी आहे, देशाशी गद्दारी होती, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी पोलखोल केली.

(हेही वाचा ‘मेरा अब्दुल ऐसा नही…’ पोस्टवर केतकी चितळेचे प्रत्युत्तर, सोशल मीडियात पोस्ट व्हायरल)

म्हणून सावरकरांनी हिंदुत्वाला प्राधान्य दिले

जेव्हा आपण वीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहब ठाकरे यांचे विचार म्हणतो, तेव्हा आपल्याला १०० वर्षे मागे जावे लागेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे वीर सावरकरांचे हिंदुत्व होते, यामध्ये सर्वांना समान वागणूक देणारे, राष्ट्रीयत्वाचे हिंदुत्व अपेक्षित होते. १९२१ ला वीर सावरकर यांना अंदमानातून रत्नागिरीत आणण्यात आले, तेव्हा तिथेही त्यांना छोट्याशा कोठडीत बंदिवासात ठेवण्यात आले होते. वीर सावरकर यांच्या हिंदुत्वाची सुरुवात इथूनच झाली, तिथेच हिंदुत्व हे पुस्तक लिहिले, कारण वीर सावरकर अंदमानात असताना १९१९ साली महमंद अली आणि शौकत अली यांनी भारतात खिलाफत चळवळ सुरु केली होती, त्या चळवळीतील काही सत्याग्रही तुरुंगात आले होते, तेव्हा वीर सावरकर यांना याची कुणकुण लागली होती, खरेतर ही चळवळ तुर्कस्थानातील होती, या राष्ट्रबाह्य आंदोलनाला महात्मा गांधींनी पाठिंबा दिला होता, त्या वेळी केरळमधील मोपला मुसलमानांनी हिंदूंचे हत्याकांड केले, स्त्रियांवर अत्याचार केले, हिंदूंच्या प्रेतांनी विहिरी भरल्या, तरीही गांधींनी तेव्हा मोपल्यांना ‘माय ब्रेव्ह मोपला ब्रदर’ म्हणून त्यांचे कौतुक केले. त्यावेळी गांधी म्हणाले होते की, त्यांना आपण शांती शिकवली नाही म्हणून त्यांना हिंसा हाच धर्म वाटत आहे, त्यामुळे त्यांचे काही चुकत नाही.’ तेव्हा वीर सावरकर यांचे हिंदुत्व जागे झाले, एवढा अत्याचार होऊनही ८० टक्के हिंदू गप्प का राहिले, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर वीर सावरकर यांनी ज्यांचे पूर्वज या भूमीत जन्मले आणि ज्यांचा धर्म अथवा पंथ याचा उगम या भूमीत झाला, हे सगळे हिंदू. या व्याख्येमुळे ख्रिश्चन, ज्यू आणि मुसलमान वगळता भारतातातील सगळे धर्म-पंथ हिंदू ठरतात. वीर सावरकर यांनी हिंदू समाजाला संघटित केले पण ते कारागृहात होते, असेही रणजित सावरकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे विचार हिंदुत्वाचे नाही

जेव्हा १९९२ मध्ये हिंदूंच्या कत्तली होत होत्या, तेव्हा बाळासाहेबांनी एक आदेश दिला आणि रात्रीत परिस्थिती बदलली, मशिदीवरील हिरवे झेंडे खाली उतरले आणि पांढरे झेंडे लागले होते. त्या बाळासाहेबांचा वारसा आम्ही सांभाळतो म्हणणारे उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला राहुल गांधींसोबत हातात हात घालून चालायला पाठवतात, हे हिंदुत्व नाही, असे रणजित सावरकर म्हणाले. वीर सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते, तेव्हा सर्वच कैद्यांना उपजीविकेसाठी भत्ता मिळायचा, तसा भत्ता देणे बंधनकारक होते, त्यावेळी स्थानबद्ध असलेल्या काँग्रेस नेत्यांना महिन्याला १५० रुपये भत्ता मिळायचा, वीर सावरकर यांना केवळ ६० रुपये मिळायचा. सावरकर १३ वर्षे स्थानबद्ध होते, त्यांना भत्ता ५-६ वर्षेच मिळाला. अशा परिस्थितीत ज्या माणसाने  स्वातंत्र्य संग्रामात आपली जहागीर घालवली, तारुण्याची राखरांगोळी केली, असा माणूस ५-६ हजार रुपयांसाठी असे काही करेल, असा आरोप करणेही हास्यास्पद आहे, असेही रणजित सावरकर म्हणाले.

(हेही वाचा कोणताही उद्योग राज्याबाहेर १-२ महिन्यात जात नाहीत, ती काय जादूची कांडी आहे का? – मुख्यमंत्र्यांचा घणाघात)

गांधींना जिनांना करायचे होते पंतप्रधान

१९४२ साली महात्मा गांधी यांनी महमंद अली जिना यांना ‘तुम्ही भारताचे पंतप्रधान व्हा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ’, असे म्हटले होते. १९८९ मध्ये देशाचा गृहमंत्री जेव्हा मुसलमान झाला होता, तेव्हा त्यांची मुलगी पळवण्यात आली आणि त्या बदल्यात २२ अतिरेक्यांची सुटका करण्यात आली, त्यानंतर काही महिन्यातच काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाला आणि काश्मीरी पंडितांना पलायन करावे लागले होते. जर देशाचे पंतप्रधान जिना झाले असते, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदेंचे हे  बंड नाही, ही क्रांती!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड नाही, तर क्रांती केली आहे. अडीच वर्षे आम्हाला दुःख होते, तुम्ही क्रांती करून बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा जिवंत केली, काळ वाईट आहे, दगाफटका झाला तर काय होते ते आपण अडीच वर्षे पहिले आहे. जर उद्या केंद्रात दगाफटका झाला तर गेल्या दहा वर्षांत केलेले सगळे वाया जाणार आहे. त्यामुळे ‘जो हिंदू हित कि बात करेगा, वही देश पे राज करेगा’, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.