शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज, गुरूवारी दहावा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक मुंबईतील शिवतीर्थावर असलेल्या बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त एक ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना फोटो शेअर करत आठवणींनी उजाळा देत भावूक असे ट्विट केले आहे.
(हेही वाचा – बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी सामनाचा विशेष अग्रलेख; ‘बाळासाहेब स्वाभिमानाचा हिमालय’…)
हे नाते खुप जुने आहे.
ये रिश्ता बहोत पुराना है..
साहेब..
विनम्र अभिवादन !
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/vDhofuiVbi— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2022
काय आहे राऊतांचे ट्विट
बाळासाहेब आणि संजय राऊत एका फ्रेम असलेला एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो राऊत यांनी ट्विट केला आहे. या फोटोसोबत संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले की, “हे नाते खुप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है… साहेब.. विनम्र अभिवादन !जय महाराष्ट्र!”
साहेब…
जय महाराष्ट्र ! pic.twitter.com/qK0ZufV9is— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2022
यासह त्यांनी आणखी एक ट्विटमध्ये बाळासाहेब यांनी अभिवादन करणारे पोस्टर ट्विट केले आहे. यो पोस्टरवर साहेब, प्रत्येक श्वास तुमच्यासाठी, प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी…असा उल्लेख केला आहे. तसेच बाळासाहेबांच्या दहाव्या स्मृतीदिनी अभिवादनाची भावना राऊत यांनी व्यक्त केली आहे. गुरूवारी पहाटेपासूनच शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळासमोर नतमस्तक होण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी सुरू आहे. सकाळीच शिंदे गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. यानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी तेथे गोमूत्र शिंपडून समाधीस्थळ शुद्ध केले आणि बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.