राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेत दररोज अनेक हास्यास्पद प्रकार पहायला मिळत आहेत. बुधवारी रात्री राहुल गांधींची वाशिम जिल्ह्याच्या मेडशी येथे सभा झाली. या सभेदरम्यान एक विचित्र प्रकार घडला आणि राहुल गांधींसोबत सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांची चांगलीच फजिती झाली.
सभेनंतर राहुल गांधींसह काँग्रेस नेते राष्ट्रगीतासाठी उभे राहिले असताना अचानक स्पीकरवर भारताच्या राष्ट्रगीताऐवजी चक्क नेपाळचे राष्ट्रगीत वाजू लागले आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मंचावरील नेत्यांची चांगलीच पळापळ झाली. दरम्यान यावरुन भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
(हेही वाचाः ‘मी राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नाही, पण…’, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया)
काय झाले नेमके?
सभेला संबोधित करुन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी माईकवरुन राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याचे सर्वांना आवाहन केले. त्यानुसार मंचावर उपस्थित महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व काँग्रेस नेते राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. पण स्पीकरवर चक्क नेपाळचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत भारताऐवजी वाजले नेपाळचे राष्ट्रगीत, झाली एकच फजिती@shewale_rahul @Devendra_Office #RahulGandhi #rashtragit #nepalirashtragit pic.twitter.com/ab0il6tt7C
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) November 17, 2022
त्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. हे नेमकं कुठलं गाणं लागलं याचा राहुल गांधींनाही प्रश्न पडला. त्यानंतर त्यांनी भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावरुन भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार घणाघात केला आहे.
(हेही वाचाः नोटाबंदीचा निर्णय घेण्यामागे शिफारस कोणाची? केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलं उत्तर)
भातखळकर आणि राणेंची टीका
ज्या मूर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना ओळखेल कसा? हा डोक्यावर पडलेला आहे, तरीही त्याला डोक्यावर घेणारे जोकर या देशात आहेत, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
ज्या मूर्खाला राष्ट्रगीत कळत नाही, तो राष्ट्रपुरुषांना ओळखेल कसा? हा डोक्यावर पडलेला आहे, तरीही त्याला डोक्यावर घेणारे जोकर या देशात आहेत. pic.twitter.com/PWObDa2mb1
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 17, 2022
तसेच ‘पप्पू का कॉमेडी सर्कस’ असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp CommunityPapu ka comedy circus 😂 pic.twitter.com/tKQ0FDa5Vl
— nitesh rane (@NiteshNRane) November 16, 2022