शिव संग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या अपघातानंतर पोलिसांनी मेटेंच्या कारचालकाला ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणी बुधवारी विनायक मेटेंच्या कारचालकावर सीआयडीकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या अपघाताला जबाबदार असलेल्या विनायक मेटेंचा कार चालक एकनाथ कदम याला आज गुरूवारी अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले ‘हे’ आदेश)
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन महिन्यांपूर्वी भीषण अपघात झाला होता. यामध्ये मेटेंचे अपघाती निधन झाले. मात्र, मेटे यांच्या मृत्यूनंतर काही नेत्यांनी या अपघाताबाबत शंका उपस्थित केली होती. अपघातात बचावलेला कार चालक एकनाथ कदम याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदोशानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले होते. सीआयडीने कारचालकाची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर रसायनी पोलिस स्थानकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज, गुरूवारी चालकाला अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. 304 ए, 304 2 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तपासातून काय आले समोर
सीआयडीने महामार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. यावेळी कारचालक एकनाथ कदम हा सातत्याने 120 ते 140 किमी.च्या वेगाने गाडी चालवत होता. तसेच अपघाताच्या काही वेळ आधी दुस-या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर हा अपघात झाल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळेच सीआयडीने कारचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
Join Our WhatsApp Community