स्वा. सावरकर यांच्याबद्दल अनेकांच्या मनात आदरच आहे. तरी देखील एका विशिष्ट गटाकडून सावरकरांवर अविरत टीका होत असते. महत्वाचे म्हणजे शासकीय स्तरावर सावरकरांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार केला गेला नसला तरी जनसामान्यांमध्ये त्यांच्या साहित्याला प्रचंड मागणी आहे. आणि सावरकरांनी केलेल्या त्यागाबद्दल लोक कृतज्ञ आहेत. हे सांगायचं कारण म्हणजे आता कॉंग्रेसच्या मानगुटीवर बळजबरी बसलेले युवराज राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांवर टीका करत आपल्या तोकड्या बुद्धीची पात्रता दाखवून दिली आहे.
राहुल गांधी यांच्या आयुष्याचं गणित चुकलं
माझं नेहमी असं म्हणणं असतं की सावरकरांवर काय तर तुम्ही कोणत्याही महापुरुषावर टीका करु शकतो, तेवढा अधिकार लोकशाहीने आपल्याला दिला आहे. पण सेक्युलर म्हणवणार्यांच्या विश्वात त्यांना प्रिय असलेल्या महापुरुषांवर टीका केली तर ही मंडळी थयथयाट करत सुटतात. दुसरी गोष्ट सावरकरांवर टीका केली तरी सत्य बोलावे अशी किमान अपेक्षा असते. राहुल गांधी यांच्या आयुष्याचं गणित चुकलं असल्यामुळे इतिहासाबद्दलच्या अभ्यासाबाबत त्यांच्याकडून अपेक्षा करणं म्हणजे महापाप होय!
राहुल गांधींकडून अपेक्षा ठेवता येत नाही
म्हणून मला राहुल गांधींची कीव येते आणि सोनिया गांधींची दया! राहुल गांधी हे बहुसंख्य भारतीय समाजाने नाकारलेले नेते(?) आहेत. मुळात त्यांना भारत जोडो यात्रा काढण्याची नव्हे तर ’आत्मपरिक्षण करि’ या आंदोलनाची नितांत आवश्यकता आहे. स्वातंत्र्य योद्धा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी लोकांसमोर बोलताना म्हणाले की “‘वह (मुंडा) एक इंच भी पीछे नहीं हटे. वह शहीद हो गए. ये आपके (आदिवासी) प्रतीक हैं और आपको रास्ता दिखाते हैं. बीजेपी-आरएसएस के प्रतीक सावरकर हैं. वह दो-तीन साल तक अंडमान में जेल में रहे. उन्होंने दया याचिकाएं लिखनी शुरू कर दीं. वह अंग्रेजों से पेंशन लेते थे, उनके लिए काम करते थे और कांग्रेस के खिलाफ काम करते थे” मागे चंद्रशेखर साने यांनी महात्मा गांधी देखील इंग्रजांकडून पेन्शन घेत होते हे पुरावे देऊन सिद्ध केले. इंग्रजांकडून कैद्याला पेन्शन मिळतच होती. परंतु ‘अभ्यासे प्रकट व्हावे’ याविरुद्ध राहुल गांधी वागतात. कारण राहुल गांधींकडून ही अपेक्षा ठेवता येत नाही. खरं पाहता राहुल गांधी हे एक गूढ व्यक्तिमत्व आहे. त्यांचं खरं आडणाव भारतीय जनतेला ज्ञात नाही. ते पार्टटाईम राजकारण करतात आणि इतर वेळी ते नेमके काय करतात हे कुणालाच माहित नाही.
(हेही वाचा लव्ह जिहाद : आफताबने हत्या केलेली हिंदू युवती होती गर्भवती?)
लाज गहाण टाकली
भारताची सध्याची वाटचाल पाहता आज भारत सावरकरांच्या मार्गाने चालत आहे. म्हणून आपण सुरक्षित आहोत. आपण पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर दिलं म्हणून अतिरेकी कारवाया खूपच कमी झाल्या आहेत. आणि कदाचित हेच राहुल गांधी यांचं दुखणं असावं. भारतात शांतता नांदली तर राहुल गांधींचं दुकान बंद पडेल. खरंतर ते बंद पडलेलं आहे. परंतु कॉंग्रेसचा ताबा त्यांच्याकडे असल्यामुळे ते निश्चिंत आहेत. ज्या दिवशी कॉंग्रेसमधून त्यांची हकालपट्टी होईल, त्या दिवशी राहुल गांधी साधे खासदारही होऊ शकणार नाही. परंतु कॉंग्रेसच्या लोकांनी आपली लाज गांधी कुटुंबाकडे गहाण टाकली असल्याने अशाप्रकारचा उठाव कॉंग्रेसमध्ये शक्य नाही. आता राहुल स्वतःला सॉफ्ट हिंदू दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते स्वतःला जनेऊधारी ब्राह्मण म्हणवतात, हिंदू रितीप्रमाणे पूजा वगैरे करतात (देवीवर गलिच्छ शब्दांत टीका करणार्या सुषमा अंधारे देखील देवीच्या दारी जातात. इतका सुरेख अभिनय कसा जमतो या लोकांना?) मोदींमध्ये आपण मोठे हिंदू आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच वेळी ते सावरकरांवर टीका करतात आणि त्यांना असं वाटतं की लोक आपल्याला स्वीकारतील.
राहुल गांधींना राष्ट्रीय पातळीवर लाजीरवाणा पराभव स्वीकारायला लावला
नरेंद्र मोदी यांच्यावर वाह्यात टीका करणार्यांना जनता नेहमीच धडा शिकवत आली आहे. स्वा. सावरकरांच्या बाबतीत देखील तसेच आहे. लक्षात घ्या, ज्यावेळी मोदींनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला तेव्हा सर्वात जास्त चर्चा स्वा. सावरकरांची झाली होती. कारण अनेक लोकांचं समर्थक व विरोधकांचं देखील हेच म्हणणं होतं की मोदी हे सावरकरवादी आहेत. आणि त्या काळात राहुल गांधी सावरकरांवर कठोर टीका करत होते. तेव्हा जनतेने राहुल गांधींना राष्ट्रीय पातळीवर लाजीरवाणा पराभव स्वीकारायला लावून जणू त्यांच्या मुस्कटात जाळ काढला होता. मोदी हे सावरकरवादी आहेत अशी चर्चा रंगली असताना देखील मोदींना जनतेने निवडून दिलं. कारण जनतेला कधीच सावरकरांची अडचण वाटली नव्हती. तर सावरकरांच्या मार्गावरुन चालणारा एक खंबीर नेता लोकांना हवा होता. ती कमतरता मोदींनी दूर केली. त्यामुळे राहुल गांधींच्या बालबुद्धीला जर असं वाटत असेल की आपण सावरकरांच्या विरोधात हिंदूंना एकत्र करु शकतो तर त्यांनी “कच्चा पापड पक्का पापड” किंवा “मोक्षगुंडम विश्वेश्वरया” हे सलग किमान २५ – ३० वेळ न चुकता म्हणून दाखवावं. आता वाचक असं म्हणतील की सावरकरांवरील टीकेचा आणि या टंग ट्विस्टरचा काय संबंध? याच न्यायाने राहुल गांधींचा आणि इतिहासाचा, राहुल गांधींचा आणि राजकारणाचा, राहुल गांधींचा आणि बुद्धीचा काय संबंध असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर वाचकहो, राहुल गांधी यांना असे वाटते की ते सावरकरांवर टीका करुन जिंकून येऊ शकतात. परंतु सत्य परिस्थिती तर अशी आहे की सावरकरांवर टीका करायला लागल्यापासून त्यांचा वाईटरित्या पराभव होत आहे. त्यांना अमेठी सोडून वायनाडला चोरासारखं पळावं लागलं.
राहुल कधीच भारत जोडू शकत नाहीत
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींनी सावरकरांवर टीका करुन खूप मोठा मूर्खपणा केला आहे. बिरसा मुंडा यांनी वनवासी हिंदूंना एकत्र आणलं आणि इंग्रजांविरुद्ध लढा दिला. सावरकरांनी सर्व हिंदूंना एकत्र आणून इंग्रजांविरुद्ध लढा दिला. इंग्रजांशी दोन हात करताना त्यांनी हिंदूंमधील भेदभाव मिटवले. बिरसा मुंडा आणि सावरकरांची अशाप्रकारे तुलना होऊ शकते. परंतु राहुल यांनी बिरसा मुंडांशी सावरकरांची तुलना करताना त्यांच्यावर टीका केली. गंमत म्हणजे राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत, भाजप द्वेष पसरवतो म्हणत आहेत आणि स्वतः द्वेषपूर्ण भाषण करत आहेत. कारण तुकडे तुकडे गॅंगला पाठिंबा देणारे आणि त्यांची भाषा बोलणारे राहुल कधीच भारत जोडू शकत नाहीत. त्यांना हिंदू कळले नाहीत आणि सावरकर कळण्याची त्यांची पात्रता नाही.
Join Our WhatsApp Community