काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला. त्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. गुरुवार, १७ नोव्हेंबर रोजी शेगाव येथे होणारी राहुल गांधी यांची सभा उधळून लावणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. ही सभा उधळण्यासाठी मनसे गनिमी काव्याने शेगावमधील सभेत घुसणार असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
मनसैनिक ठाण्यातून शेगावच्या दिशेने रवाना
मी तुमचा नोकर होऊन राहण्यास तयार आहे, असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांकडे माफीनामा सादर केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील शेगाव येथे पोहोचली आहे. शेगाव येथे काँग्रेसकडून भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यापुढे राहुल गांधी पुन्हा कधी महाराष्ट्रात सभा घेणार नाही असा धडा शिकवू, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. मुंबईहून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नाशिक या मार्गावरून मनसैनिक शेगाव येथे पोहोचणार आहेत. ही सभा उधळून लावण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शेकडो कार्यकर्ते ठाण्यातून शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत.
(हेही वाचा हिंदु देवतांची टिंगल करणार्या वीर दासचा ‘आवाज’ मुंबईतही होणार बंद)
Join Our WhatsApp Community