बॅंकिंग सेवा होणार ठप्प? आजच उरका बॅंकेची कामे

140

तुमचे बॅंकेत किंवा बॅंकेशी संबंधित काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बॅंकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या देशव्यापी संपामुळे बॅंकेच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान देशभरात बॅंकिंग सेवा ठप्प होऊ शकतात, त्यामुळे ग्राहकांनी आपली सर्व महत्त्वाची कामे आजच आटोपून घ्यावी, जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्धभवणार नाही.

( हेही वाचा: गोवरमुळे सहा महिन्यांच्या चिमुकलीचा बळी )

19 नोव्हेंबर रोजी बॅंकांचा संप

ऑल इंडिया बॅंक एम्प्लाॅईज असोसिएशन (AIBEA) ने कॅशोलिक सिरियन बॅंक आणि डीबीएस बॅंकेच्या कर्मचा-यांना 11 व्या द्विपक्षीय वेतन सुधारणा नाकारण्यासह कायमस्वरुपी नोक-यांचे आऊटसोर्सिंग ( कॅश मूव्हमेट जाॅब आणि हाऊसकिंपिंग जाॅब) आणि काही बॅंकांमधील नोकरीच्या सुरक्षितलेला धोका यासह अनेक मुद्द्यांच्या निषेधार्थ 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

..म्हणून नियोजित संप सुरु ठेवणार

कर्मचारी संघटना आणि इंडियन बॅंक्स असोसिएशन यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेत कोणताही सकारात्मक किंवा समाधानकराक तोडगा न निघाल्यामुळे बॅंक युनियन्सने 19 नोव्हेंबरचा नियोजित देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीए आणि बॅंक व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे 19 नोव्हेंबर नियोजित संप सुरुच ठेवू असे आम्ही त्यांना सांगितले. तसेच मुख्य कामगार आयुक्तांनाही कळवले आहे, असे एआयबीईएचे सरचिटणीस व्यंकटचलम यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.