काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना थेट इशारा दिला आहे. राहुल गांधी यांची यात्रा थांबवायची असती तर आम्ही ती पहिल्याच दिवशी थांबवली असती, पण आम्हाला त्यात रस नाही, मात्र महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांविरोधात बोलणे आम्ही खपवून घेणार नाही. यासह राहुल गांधींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
(हेही वाचा – सरकार कोसळण्याच्या आदल्या दिवशी निधी मंजूर करणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदे-फडणवीसांकडून दणका!)
पुढे बावनकुळे असेही म्हणाले की, राहुल गांधींच्या वक्तव्याने देशाची मान खाली गेली आहे. वीर सावरकरांबद्दल राहुल गांधी आक्षेपार्ह विधान करत आहे आणि काँग्रेस त्याचे समर्थन करत आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहित असून ते जाणून बुजून तो इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चुकीचे विधान केल्याने देशात त्यांच्याबद्दल घृणा निर्माण होत आहे. देश राहुल गांधी यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी या यात्रेतून जे काही समर्थन कमावले ते या केलेल्या विधानाने गमावले आहे.
राजीव गांधींच्या जयंतीस पुण्यतिथीला उद्धव ठाकरेंना आदरांजली वाहतात. मात्र माझा प्रश्न आहे की, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहुल गांधी कोठेही प्रतिमेला फुलं वाहिलीत का, चार शब्द बोलले का…उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे. ते काँग्रेसला समर्पित झाले आहे. राहुल गांधींनी केलेल्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे गट राहुल गांधींच्या यात्रेचा बहिष्कार जाहीर करतील असे वाटले होते, मात्र आदित्य ठाकरेंना ते पाठवतात, असे म्हणत टोलाही लगावला.
Join Our WhatsApp Community