पुण्यातील सिंहगडावर २१ नोव्हेंबरपासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या पिशवीमधील वेफर्स, नूडल्स यांसारखे पदार्थ सुद्धा गडावर विकण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या नियमांचे पालन न केल्यास १०० ते ५०० रुपये दंड वसूल करण्यात येईल असे वन विभागाने सांगितले आहे.
( हेही वाचा : पश्चिम रेल्वेकडून मुंबईकरांना गिफ्ट, तर मध्य रेल्वेवर शनिवारपासून २७ तासांचा मेगाब्लॉक! )
२१ नोव्हेंबरपासून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई
पुण्यातील महत्त्वाचा किल्ला म्हणून सिंहगड किल्ला ओळखला जातो. या किल्ल्यामुळे बऱ्याच पुणेकरांना रोजगार प्राप्त होतो. गडावर मिळणाऱ्या पिठलं-भाकरी आणि कांदा भजीचे पर्यटकांना विशेष आकर्षण आहे. परंतु यासोबतच किल्ल्यावर मिळणाऱ्या प्लास्टिकच्या आवरणातील पदार्थांवर बंदी येणार आहे. सिंहगडावर आता सगळ्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे आणि २१ नोव्हेंबरपासून प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
स्टॉल धारकांचे अतिक्रमण
किल्ल्यावर प्लास्टिकच्या खेळण्यांपासून अनेक दुकाने आहेत. गडाच्या पार्किंगपासूनच गडावरसुद्धा मोठ्या प्रमाणात जागोजागी स्टॉल्स आहेत. या स्टॉल धारकांचे अतिक्रमण रोखण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या होत्या मात्र याकडे विक्रेत्यांनी दुर्लक्ष केल्याने वनविभागाने आता कडक कारवाई करण्याता आणि संपूर्णपणे प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंहगडावर पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यास, प्लास्टिक बॉटर गडावर नेण्यास सुद्धा बंदी घालण्याचा वनविभाग विचार आहे.
Join Our WhatsApp Community