कोकण रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या आणखी दोन गाड्या डिझेलऐवजी विजेवर धावणार आहेत. कोकण रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण झाल्यानंतर अनेक गाड्या विजेवर धावू लागल्या आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व गाड्या विजेच्या इंजिनवर धावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार तिरुनेलवेली-गांधीधाम (गाडी क्र. 20923/20924) आणि मडगाव-हापा (गाडी क्र. 22907/22908) या दोन गाड्या येत्या २१ नोव्हेंबरपासून विजेवर धावणार आहेत. त्यामुळे या गाड्यांच्या प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे.
(हेही वाचा – कोकणातील सर्व रेल्वे स्थानकांचा कायपालट होणार, प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा)
गेल्या काही दिवसापूर्वी कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाल्याने आता टप्प्याटप्प्याने या मार्गावर धावणा-या गाड्या विजेवर चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. 8 नोव्हेंबरपासून इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसह सहा मार्गांवरील गाड्या या विजेवर धावण्यास सुरूवात झाली. यामध्ये सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचाही समावेश आहे.
या गाड्या धावणार विजेवर
9 नोव्हेंबरपासून कोकण रेल्वे मार्गावरुन धावणारी मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन ही जनशताब्दी एक्सप्रेस विजेवर धावण्यास सुरूवात झाली. त्याचप्रमाणे कोचुवेली ते इंदूर ही साप्ताहिक एक्सप्रेस 11 नोव्हेंबरपासून, इंदूर ते कोचुवेली ही साप्ताहिक एकस्प्रेस 8 नोव्हेंबर, भावनगर ते कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस 15 नोव्हेंबर, कोचुवेली ते भावनगर साप्ताहिक गाडी 17 नोव्हेंबर पासून विजेवर धावण्यास सुरुवात झाली आहे.
Join Our WhatsApp Community