मुंबईतील ३० वर्ष जुन्या म्हाडा इमारतींचा पुर्नविकास लवकरच केला जाणार आहे. जवळपास ३८८ इमारतींमध्ये ३० ते ४० हजार कुटुंब राहत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
( हेही वाचा : ICC T20 Ranking : भारताच्या ‘या’ गोलंदाजाची आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठी झेप; विश्वचषकातील कामगिरीचा फायदा )
हजारो कुटुंबाना दिलासा
म्हाडाने गेल्या काही वर्षात १४ हजारांहून अधिक इमारतींची पुर्नबांधणी केली आहे. परंतु दक्षिण मुंबईतील या ३८८ इमारतींना ३० वर्ष पूर्ण न झाल्याने या नव्या नियमावलीचा लाभ येथे राहणाऱ्या कुटुंबांना घेता येत नव्हता. परंतु आता ३३(२४) या खंडामध्ये सुधारणा करून ३३(७) चे सर्व फायदे लागू करून इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. म्हाडा संघर्ष कृती समिती आणि भारतीय जनता पार्टी म्हाडा सेल यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
म्हणून पुनर्विकास रखडला होता
पुरेसे क्षेत्रफळ उपलब्ध नसल्याने या इमारतींच्या पुनर्विकासासठी विकासक पुढे येत नव्हता. यानंतर विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्यात आली. ३८८ इमारतींचा उल्लेख नसल्याने या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा झाला आहे.
Join Our WhatsApp Community