वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय! संपूर्ण निवड समिती बरखास्त

173

टी२० विश्वचषकात भारताचा पराभव झाल्यानंतर भारतीय संघात बदलाची मागणी सातत्याने केली जात आहे. इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केल्यानंतर BCCI ने आता बदलाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. BCCI ने निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांच्यासह संपूर्ण निवड समिती बरखास्त केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याची घोषणा केली आहे.

( हेही वाचा : पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये अडकला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा वाहनचालक; गोपनीय माहिती पाठवताना रंगेहाथ पकडले! )

निवड समिती बरखास्त 

निवड समिती ही पाच सदस्यांची असते. मागच्या काही महिन्यांपासून निवड समितीत फक्त चार सदस्य होते. माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्म या कमिटीचे प्रमुख होते. त्यांच्यासह हरविंदर सिंह, सुनील जोशी आणि देबाशिष मोहंती या कमिटीचे सदस्य होते. चेतन शर्मा यांना डिसेंबर २०२० मध्ये मुख्य सिलेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

भारताला दोन टी२० वर्ल्डकपमध्ये अपयश आले. मागच्यावर्षी UAE मध्ये टी२० वर्ल्डकप झाला त्यावेळी विराट कोहली कॅप्टन होता. भारतीय टीम त्या वर्ल्डकपमध्ये सुपर १२ मध्येच बाहेर गेली. त्यानंतर सिलेक्शन कमिटीने रोहित शर्माला कॅप्टन बनवले. परंतु यामुळेही फारसा चांगला परिणाम झाला नाही आणि टीम इंडिया आशिया कप आणि टी२० वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये अपयश आले.

आता BCCI ने नव्या सिलेक्शन कमिटीसाठी अर्ज मागवले आहेत. सर्व ५ सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. BCCI ने २८ नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज करण्यास सांगितले आहे.

BCCI च्या अटी

  • कमीत कमी ७ कसोटी सामने खेळणे आवश्यक
  • १० वनडे आणि २० फर्स्ट क्लास मॅचचा अनुभव आवश्यक
  • ३० फर्स्ट क्लास मॅचचा अनुभव आवश्यक
  • अर्जदाराने कमीत कमी ५ वर्ष आधी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.