काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी वीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यावर राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. भाजपा, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना हे तीनही पक्ष राहुल गांधींच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपाच्यावतीने तर राज्यभर आंदोलने करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चातर्फे शनिवारी, 19 नोव्हेंबर रोजी शहरात राहुल गांधी यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक आणि खोटा बदनामीकारक इतिहास सांगून वीर सावरकरांचा व हिंदु प्रेमींचा अवमान केला आहे, असे वक्तव्य पिंपरी-चिंचवड युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी केले आहे.
राहुल गांधींविरुद्ध असंतोष
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश सदस्य अजित कुलथे, पिंपरी चिंचवड युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, तेजस्विनी कदम, दिपक नागरगोजे, उपाध्यक्ष प्रसाद कास्पटे, राहुल खाडे, शिवराज लांडगे, सतिश नागरगोजे, प्रशांत बाराथे, पंकज शर्मा, जयदिप करपे, जयदेव ढोरे, चिटणीस प्रकाश चौधरीसह संयोजक अनिकेत शेलार, सोशियल मिडीया संयोजक विक्रांत गंगावणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात असून ही यात्रा ७ सप्टेंबरला कन्याकुमारी येथून निघाली होती. केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र असा प्रवास करत आता पुढे जम्मू-काश्मीरपर्यंत जाणार आहे. महाराष्ट्रात यात्रा येऊन तीन दिवस उलटले तरी प्रसिद्धी मिळत नाही, म्हणून राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केली.
(हेही वाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर राहुल गांधींना ‘जोडे मारो’ आंदोलन )
Join Our WhatsApp Community