किशोरी पेडणेकरांच्या घरावर होणार कारवाई, काय आहे कारण?

138

मुंबई माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमता नगर येथील एसआरए इमारतीतील चार सदनिकांवर बेकायदा कब्जा केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. यानंतर किशोरी पेडणेकरांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरए इमारत क्रमांक २ मधील ६०१ क्रमांकाचे घर अवैधरीत्या ताब्यात घेतल्याचे समोर आले.

कधी होणार कारवाई

दरम्यान, एसआरएच्या नियमांचे उल्लांघन केल्याचा अहवाल एसआरएच्या सहनिबंधक सहकारी संस्था यांनी दिला आहे. त्यानुसार एसआरने महापालिकेच्या सहायक आयुक्तांना संबंधित घर निष्कासित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात पेडणेकर यांच्या घरावर कारवाई होणार आहे.

(हेही वाचा – वीर सावरकर यांनी आवेदनपत्रे दिली माफीनामा नव्हे – सात्यकी सावरकर)

सोमय्यांनी केला दावा

मिळालेल्या माहितीनुसार, सदरची सदानिका एसआरएने गंगाराम बोगा यांना वितरित केली होती. या सदनिकेचा वापर बोगा यांनी करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ही सदनिका पेडणेकर यांना राहवायास दिल्याची माहिती पेडणेकर यांनी नामनिदर्शेन पत्रासह मुंबई महापालिकेला दिल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बोगा यांनी एसआरएच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा अहवाल सहकार विभागाने एसआरए अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार सक्षम प्राधिकारी यांना महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ च्या कलम ३ (ई) अन्वये कारवाई करावी, असे एसआरएने पालिकेच्या जी दक्षिण विभागाला पत्राद्वारे कळवले आहे. याबाबत निष्कासनाची कारवाई पुढील आठवड्यात होईल, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.