राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायमंच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी देखील ट्वीट करत राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे.
‘साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असून, यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे’, अशा शब्दांत मनेसे नेते बाळा नांदगांवकर यांनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केली आहे.
(हेही वाचाः EPFO: PF बॅलन्स तपासताय? ‘या’ नंबरवर कॉल केला तर होईल लाखोंची फसवणूक)
बाळा नांदगांवकर यांचे ट्वीट
साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो. एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यांनी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही राज्यपालांनी वारंवार भावना दुखवण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे, असे ट्वीट करत बाळा नांदगांवकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाबाबत संताप व्यक्त केला आहे.
साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो. एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यानी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 19, 2022
राज्यपालांचे वादग्रस्त विधान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत असून, ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शने देखील करण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे.
Join Our WhatsApp Community