कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी तब्बल २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक दिनांक १९ आणि २० नोव्हेंबर (शनिवार/रविवार) रोजी मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात आला होता. या पुलाच्या कामामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा व वडाळा रोड स्थानकादरम्यान रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका प्रवाशांना बसू नये म्हणून मुंबईकरांसाठी बेस्ट बसचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी शनिवारी रात्रीपासून ते रविवारी रात्रीपर्यंत बेस्टने जादा बसेस सोडल्या होत्या. भायखळा ते वडाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यास बेस्टच्या बसेस दर ८ ते १० मिनिटाला धावत होत्या. त्यामुळे या मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवेवर झालेल्या परिणामाला मुंबईकरांना सामोरे जावे लागले पण बेस्ट त्यांच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले.
(हेही वाचा – पुण्यात भीषण अपघात! तब्बल 47 गाड्या एकमेकांवर आदळल्या, 60 जण गंभीर जखमी)
मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे दादर, वडाळा या ठिकाणाहून बेस्ट BEST बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे माफक दरात प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचता आले. य़ाशिवाय केईएम, वाडिया, टाटा रूग्णालयाकडे जाणाऱ्या रूग्णांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या या ब्लॉकदरम्यान मुंबईकरांचे हाल होऊ नये म्हणून बेस्टच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी १२ तासांपेक्षा अधिक काम केले. शनिवारी मध्यरात्री २ ते पहाटे ४ पर्यंत कर्मचाऱ्यांनी बससेवा बंद ठेवली होती. भायखळा स्थानकाच्या बाहेरच्या बाजूस प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टचे निरीक्षक आपले कर्तव्य बजावताना दिसले. मात्र सायंकाळी रेल्वे सेवा सुरळीत झाल्यानंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपले घर गाठले.
Join Our WhatsApp Community