स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसद्वारे तुपकर यांना इशारा देण्यात आला असून यामधये असे म्हटले की, अरबी समुद्रात होणारे जलसमाधी आंदोलन थांबवा, अन्यथा पोलीस कारवाई करू. मध्यरात्री १२ वाजता बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रल्हाद काटकर यांनी तुपकरांच्या घरी जाऊन त्यांनी ही नोटीस बजावली. मात्र कितीही नोटीस आल्या तरी मागे हटणार नाही, काहीही झाले तरी जलसमाधी आंदोलन होणारच असे म्हणत रविकांत तुपकर यांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.
(हेही वाचा – #27HrsBlock: कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी ब्लॉक होता तरीही BEST सेवा)
सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर रविकांत तुपकर यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल ८ हजार ५०० रूपये तसेच कापसाचा भाव प्रति क्विंटल १२ हजार ५०० रूपये स्थिर रहावा यासाठी सरकारने धोरण आखावे, यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत.
६ नोव्हेंबर रोजी तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांचा विराट मोर्चा निघाला होता. त्यावेळी तुपकरांनी मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात आंदोलन करू असा इशारा दिला होता. दरम्यान, तुपकरांना नोटीस दिल्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे. मात्र अशा नोटिशींना मी घाबरत नाही. काही झाले तरी जलसमाधी आंदोलनावर ठाम असल्याने सरकार आणि तुपकरांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community