काँग्रेस नेते राहुल गांधीची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेत राज्यातील काही प्रमुख नेते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी रविवारी रात्री शिवसेना नेते संजय राऊत यांना फोन केला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील नातं किती घट्ट आहे, हे सांगणारं एक ट्विटही केले आहे. यावरून राहुल गांधींना संजय राऊतांची किती चिंता आहे, अशी चर्चा सध्या होताना दिसतेय.
काय आहे राऊतांचे ट्विट
भारत जोडो यात्रेत व्यस्त असून देखील राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे ते म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतो, असे ट्विट संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी केले आहे.
(हेही वाचा – बदलापूरमध्ये रिक्षा चालकांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच, काय आहे कारण?)
भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन
माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा
ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय..— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2022
संजय राऊत यांनी याबाबत बोलताना असेही म्हटले की, राहुल गांधींसोबत माझे रविवारी बोलणं झाले. त्यांनी माझी चौकशी केली. मी जेलमध्ये असताना किती जण आले? माझ्या कुटुंबियासोबत उभे राहिले? राज्यातील प्रत्येक पक्षात माझे जुने सहकारी आहेत, पण किती आले.. राजकीय मतभेद असले तरी अशावेळी गांधी कुटुंबियांनी माझी चौकशी केली. आज राहुल गांधी देशभरात फिरत आहेत, पण त्यांच्यात साहेबपणा नाही, असेही राऊतांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community