काँग्रेसच्या ‘या’ आमदारावर बलात्काराचा गुन्हा, लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषणासह मानसिक छळ केल्याचा आरोप

130

मध्यप्रदेशच्या कमलनाथ सरकारमध्ये वनमंत्री राहिलेले उमंग सिंघार यांच्यावर धार पोलिसांनी घरगुती हिंसाचार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गंधवानी विधानसभा मतदारसंघाचे उमंग सिंघार हे आमदार असून काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सचिवपदाची त्यांच्यावर जबाबदारी असून ते राज्यातील काँग्रेसचे प्रभारीही आहेत.

काय आहे प्रकरण

वयवर्ष ३८ असणाऱ्या पीडितेने आधी जबलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जिथून धार पोलिसांकडे ही तक्रार सोपावली होती. यानंतर धार पोलिसांनी सिंघार यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून आमदार सिंघार यांनी वारंवार महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्यांसह कलम ३७६, ३७७, ८९८ ए अंतर्गत आमदार सिंघार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – ‘या राज्यपालांना कोठे पाठवायचे तिथे पाठवा पण…’; शिंदे गटाने केली ‘ही’ मागणी)

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्या पत्नीवर देखील मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा आरोप घरकाम करणाऱ्या महिलेनेच त्यांच्याविरोधात केला होता. यावेळी आमदाराच्या पत्नीने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.