नवले पुलावरील अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. त्यांनी पुण्यातील नवले पुलावरील अपघातस्थळी पाहणी केली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रस्त्याची रचना, महापालिकेकडून फूटपाथ, सर्व्हिस रोड योग्य पद्धतीने बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे. या मार्गावर अपघात का होतात? याची योग्य माहिती घेऊन रोड बांधण्यात यावे, असे त्या म्हणाल्या.
( हेही वाचा: रायगडमधील कट्टर शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नाव चक्क ‘शिवसेना’ ठेवले )
2021 मध्ये लोकसभेत नितिन गडकरी यांच्याकडे या पुलाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी या मार्गाच्या काही भागावर उपाययोजना केली. मात्र काही महत्त्वाच्या बाबी अजूनही झालेल्या नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. पुणे महापालिकेने या मार्गावर सर्व्हिस रोड बांधण्याची गरज आहे. तसेच, ज्या जागी सातत्याने अपघात होत आहेत. त्या ठिकाणाचे निरीक्षण करुन ते निश्चित करायला हवेत. हा उतार कसा कमी करता येईल, यावर रोड एक्स्पर्टकडून माहिती घेऊन उपाययोजना करायला हव्यात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सेफ्टी कायदा भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील
या पुलाच्या विषयासंदर्भात पोलीस आयुक्त, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त देखील या अपघातस्थळी भेट देणार आहेत. आम्ही सगळे मिळून या परिसराची पाहणी करणार आहोत. त्यानंतर त्रुटी नोंदवून नितिन गडकरींशी चर्चा करणार आहोत. महामार्ग झाले आहेत ते नागरिकांसाठीच आहेत. मात्र यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. त्यामुळे रोड सेफ्टी कायदा भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community