भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील RAC सुविधा केली बंद; आता फक्त कन्फर्म तिकिटावरच करा प्रवास

154

भारतीय रेल्वेने RAC तिकिटांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. प्रवाशांना गरीब रथ ट्रेनमधून कमी तिकीट दरात प्रवास करता येतो. परंतु गरीब रथ ट्रेनमध्ये आरएसी तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सततच्या तक्रारींनंतर रेल्वे बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयानंतर गरीब रथ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आता फक्त कन्फर्म सीट देण्यात येणार आहेत.

( हेही वाचा : रेल्वेने घेतला मोठा निर्णय! थर्ड एसी इकोनॉमी कोच बंद होणार; जाणून घ्या तिकीट दरांचे संपूर्ण गणित… )

गरीब रथ एक्स्प्रेसने RAC तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणी येत होत्या. गरीब रथ ट्रेनच्या बोगीमध्ये बाजूला 3 आसने आहेत, तर उर्वरित ट्रेन्समध्ये फक्त दोनच जागा आहेत. अशा परिस्थितीत आरएसी तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांना एकच जागा दिली जाते. त्यामुळे प्रवाशांना डोकेदुखी, मानदुखी, पाठदुखी अशा अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भात रेल्वेला अनेक प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

2006 मध्ये गरीब रथ एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली होती. रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, गरीब रथ एक्स्प्रेस ट्रेनमधील RAC ची तरतूद रद्द करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सध्या भारतात एकूण ५६ गरीब रथ गाड्या चालवल्या जातात.

RAC तिकीट म्हणजे काय?

RAC म्हणजे reservation against cancellation,आरएसी तिकीट अंतर्गत रेल्वे एका स्लिपर सीटवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी असते. परंतु गरीब रथमध्ये साईड बर्थला ३ जागा असल्यामुळे एका सीटवर ३ जणांना प्रवास करावा लागत होता. RAC तिकिटे कन्फर्म होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.