जर तुम्ही अद्याप गॅस कनेक्शन घेतले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतात साधारण सर्वच घरात गॅस सिलिंडरचे कनेक्शन (lpg gas connection) आहे. मात्र कित्येक जणांना गॅस सिलिंडरशी संबंधित ग्राहकांच्या अधिकारांबाबत पुरेशी माहिती नसते. परंतु गॅस डीलरने ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल ग्राहकांना माहिती दिली पाहिजे, मात्र तसे होताना दिसत नाही. याकरता ग्राहकांनी स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असले पाहिजे.
तुम्हाला माहिती आहे का, जे ग्राहक एलपीजी गॅस कनेक्शन घेतात त्यांना ५० लाख रूपयांपर्यंतचा विमा असतो. या पॉलिसीला एलपीजी इन्शुरन्स कव्हर असे म्हटले जाते. गॅस सिलिंडरमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हमीसाठी हा विमा दिला जातो. तुम्हाला गॅस कनेक्शन मिळताच तुम्ही या पॉलिसीसाठी पात्र ठरतात. त्यामुळे हे कनेक्शन मिळताच तुम्हाला हा विमा मिळेल.
(हेही वाचा – LPG गॅस सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय! प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा)
गॅस सिलिंडर खरेदी करताना तुमचा एलपीजी विमा तयार केला जातो. हा विमा सिलिंडर एक्सपायरी डेशी जोडलेले असते. त्यामुळे तुम्हाला गॅसवरील एक्सपायरी डेट पाहूनच सिलिंडर घ्यावा लागणार आहे. गॅस कनेक्शन घेताच तुम्हाला 40 लाख रुपयांचा अपघाती विमा देण्यात येतो. तसेच सिलिंडरच्या स्फोटामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचा दावा केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त मासिक प्रीमियम शुल्क भरावा लागणार नाही
Join Our WhatsApp Community