चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून वनाधिकाऱ्यांनी अंदाजे साडेतीन वर्षांच्या वाघाला जेरबंद केले. या वाघाने तीन माणसांचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सायंकाळी 6:45 मिनिटांनी वाघाला बेशुद्ध करून वनाधिकाऱ्यांनी जेरबंद केले.
ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील बांद्रा बीट सीएन 1047 येथून हा वाघ जेरबंद करण्यात आला. या वाघाला पकडण्याचे आदेश वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी नुकतेच दिले होते. वाघाला पकडण्यासाठी चंद्रपूर येथील ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचाव गट कार्यरत होता. अखेरीस सोमवारी वाघाला पकडण्यात टीमला यश आले. या कारवाईत पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव)डॉ.रविकांत शामराव खोब्रागडे , शूटर अजय चुडामण मराठे, अतुल एन.मोहुर्ले,भोजराज आर.दांडेकर, सुनील पी.नन्नावरे, अमोल डी.तिखट सदस्य,अमोल डी.कोरप,अक्षय एम.दांडेकरवाहन चालक, तसेच ब्रम्हपुरी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. शेंडे, वन्यजीव अभ्यासक,राकेश अहुजा, यांनी सहभाग घेतला.
Join Our WhatsApp Community