अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येता कट रचण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाऊद इब्राहिमचे दोन हस्तक मारणार असल्याची माहिती (ऑडिओ मेसेज) वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपद्वारे मिळाली आहे. या मेसेजनंतर आता पोलीस सतर्क झाले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे.
(हेही वाचा – हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराणी फूटबाॅलपटूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार; व्हिडीओ होतोय व्हायरल)
मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईन व्हॉट्सअसप नंबरवर सलग दोन दिवस असा धमकीवजा ऑडिओ मेसेज आला होता. एका ऑडिओ क्लिपमध्ये दाऊदच्या दोन हस्तकांची नावे घेतली आहे. एकूण 7 मेसेज अज्ञात व्यक्तीने पाठवले आहेत, ज्यामध्ये काही ऑडिओ क्लिपही आहेत. हे दोघे जण पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट रचत आहेत, असे म्हटले आहे. त्यासह देशाला बरबाद करण्याचा प्रयत्नही करत आहेत, असेही सांगण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुस्तका अहमद आणि नवाज या नावाचे दोन दाऊदचे हस्तक पंतप्रधानांना मारणार आहे, अशी ऑडिओ क्लिप पोलिसांना प्राप्त झाल्याने मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या मेसेजनंतर सतर्क झाल्या असून त्यांनी यासंदर्भात तपास सुरू केला आहे.
Join Our WhatsApp Community