आतापर्यंत बीए, बीएससी किंवा बीकॉम (BA, BSC, Bcom) करणा-यांना तीन वर्षांत पदवी मिळत होती. मात्र पुढील वर्षापासून पदवीच्या शिक्षणासाठी चार वर्षे अभ्यास करावा लागणार आहे. वास्तविक, UGC ने चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची (FYUP) रूपरेषा तयार केली आहे. येत्या शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये सर्व विद्यापीठांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. म्हणजेच पुढील वर्षी जे विद्यार्थी बीए, बीएससी किंवा बीकॉमला प्रवेश घेतील, त्यांचा अभ्यासक्रम चार वर्षांचा असेल. अहवालानुसार, UGC पुढील आठवड्यात सर्व विद्यापीठांसह चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे नियम सामाविष्ट करणार आहे.
( हेही वाचा: मुंबईत पार्किंगसाठी सरकारचे काही धोरण आहे का? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल )
4 वर्षांचा अभ्यासक्रम सर्व विद्यापीठांमध्ये लागू होणार
पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीत करण्यात आलेला बदल देशातील सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये लागू होईल. केंद्रीय विद्यापीठांसह बहुतांश राज्यस्तरीय आणि खासगी विद्यापीठेही चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम राबवणार आहेत. अहवालानुसार, देशातील अनेक डीम्ड टू बी युनिवर्सिटी ते स्वीकारण्यास तयार आहेत.
तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय?
तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही चार वर्षांचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची सुविधा दिली जाईल. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांच्या मते, 4 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची संपूर्ण योजना लवकरच सार्वजनिक केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community