गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. विरोधकांकडून राज्यपालांना हटवण्याची मागणी होत असतानाच आता भाजप नेत्यांनी देखील राज्यपालांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे.
आशिष शेलारांनी स्पष्ट केली भूमिका
भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज्यपालांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मी राज्यपालांच्या विधानाशी 100 टक्के असहमत आहे. त्यांचा हेतू असेल किंवा नसेल पण मी त्यांच्या विधानाशी सहमत नाही. हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्यातही फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाशी पूर्णतः असहमती दर्शवली आहे, असेही आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः ‘राज ठाकरे या दिवशी सगळ्यांचा हिशोब करणार’, मनसे नेत्याने स्पष्टच सांगितले)
राज्यपालांच्या विधानाचे पडसाद
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवीदान समारंभात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. आपल्या भाषणात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली होती. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून,विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
Join Our WhatsApp Community