सध्या आफताबप्रकरणामुळे लव्ह जिहाद’ची प्रकरणे विशेष करून चर्चेत येऊ लागली आहेत. ज्यात मुसलमान तरुण हिंदू मुलींना फूस लावून त्यांचे जबरदस्तीचे धर्मांतर करतात, मात्र औरंगाबादमध्ये वेगळेच प्रकरण आहे. इथे मुलगी मुसलमान आहे, तर मुलगा बौद्ध आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध जोडले गेले, मात्र जेव्हा विवाहाची वेळ आली, त्यावेळी मात्र मुलगा दीपक सोनावणे याला मुसलमान धार स्वीकार, अशी जबरदस्ती करण्यात आली आहे. त्यासाठी सोनावणे यांना जबरीस्थीने मारहाण करण्यात आहे. त्यामध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा आरोप होत आहे.
तरुणीने दीपक याच्यावर अत्याचार करून ११ लाख उकळले
अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेताना बौद्ध धर्मीय तरुण दीपक सोनावणे यांचे मुसलमान तरुणीसोबत ओळख झाली. पुढे हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यातून मात्र दीपकवर मुसलमान धर्मात धर्मांतरासाठी दबाव वाढला आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या टीमकडून तरुणाला मारहाण करण्यात आली, असा आरोप भाजपचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी केला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या तरुणाने पत्रकार परिषद घेऊन तरुणीसह तिच्या नातेवाइकांनी अमानुष छळ करीत 11 लाख रुपये उकळल्याचा आरोप केला होता. दीपक याने ‘आपल्याकडून मुलीने लग्नाचे आमिष दाखवून रोख व ऑनलाइन स्वरूपात 11 लाख रुपये उकळले. तसेच लग्नासाठी धर्मांतराची अट घातली. मार्च 2021 मध्ये तरुणी व तिच्या नातेवाइकांनी नारेगाव येथील घरी नेऊन दीपकला निर्वस्त्र करीत बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडीओ तयार केला’, असे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये तरुणावर एमआयडीसी सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चिकलठाणा ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला. त्यात त्याचे वडील व बहिणींनाही आरोपी केले होते, असा आरोप तरुणाने केला.
(हेही वाचा ट्रेनच्या बोगीत मुसलमान नमाज पठण करतात, मंत्रोच्चार करणाऱ्या माजी सैनिकाला मात्र मारहाण करतात)
जलील यांच्यावर अट्रोसिटी लावण्याची मागणी
आता या प्रकरणात भाजपने उडी घेतली असून, मंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. खासदाराच्या उपस्थितीत आणि सांगण्यावरून दलित तरुणाला मारहाण केली हे अत्यंत घृणास्पद आहे. त्यामुळे खासदार जलील यांच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे.
Join Our WhatsApp Community