ऑनलाईन बॅंकिंगमुळे ग्राहकांना अनेक सेवा घरबसल्या मिळत असल्या तरीही अशी काही बॅंकेची कामे असतात ज्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष बॅंकेत जावे लागते. तुमचीही काही बॅंकांची कामे बाकी राहिली असतील तर ती वेळेत पूर्ण करा कारण डिसेंबर महिन्यात बॅंका तब्बल १३ दिवस बंद राहणार आहेत.
( हेही वाचा : SBI बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी; मिळेल ६३००० पर्यंत पगार, असा करा अर्ज!)
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) प्रत्येक महिन्याच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर करते. डिसेंबर महिन्यातील यादी सुद्धा RBI ने जारी केलेली आहे. पुढच्या महिन्यात तुमचे बॅंकेत काही महत्त्वाते काम असल्यास डिसेंबरमधील सुट्ट्यांची यादी नक्की तपासून पहा. डिसेंबरमध्ये चार रविवार आणि दुसऱ्या -चौथ्या शनिवारी बॅंका बंद राहणार आहेत.
ख्रिसमसमुळे २४ ते २६ दरम्यान लॉंग वीकेण्ड असणार आहे. त्यामुळे बॅंकांना सुट्टी असेल. २९ डिसेंबर रोजी छत्तीसगड, ३० डिसेंबर मेघालय, ३१ डिसेंबर रोजी मिझोराममध्ये बॅंकांना सुट्टी असेल. बॅंका १३ दिवस बंद असल्या तरीही ATM सुविधा आणि ऑनलाईन बॅंकिंग सुविधा सुरू असणार आहेत. त्यामुळे पैशांची देवाणघेवाण तसेच अनेक छोटी-मोठी कामे ऑनलाईन बॅंकिगद्वारे केली जाऊ शकतात.
डिसेंबर २०२२ मध्ये येणार्या बँक सुट्ट्यांची यादी पहा….
- ३ डिसेंबर – शनिवार सेंट झेव्हियर्स फेस्टिव्हल – गोवा
- ४ डिसेंबर – रविवार – साप्ताहिक सुट्टी
- १० डिसेंबर – शनिवाप – दुसरा शनिवार
- ११ डिसेंबर – रविवार – साप्ताहिक सुट्टी
- १२ डिसेंबर – सोमवार – पा-तगान नेंगमिंजा संगम – मेघालयमध्ये सुट्टी
- १८ डिसेंबर – रविवार – साप्ताहिक सुट्टी
- १९ डिसेंबर – सोमवार – गोवा लिबरेशन डे – गोव्यात कामकाज बंद
- २४ डिसेंबर – शनिवार – चौथा शनिवार
- २५ डिसेंबर – रविवार – साप्ताहिक सुट्टी
- २६ डिसेंबर – मेघालय, सिक्किम आणि मिझोराम सुट्टी
- २९ डिसेंबर – गुरुवार- गुरु गोविंद सिंह जयंती – मेघालयात बंद
- ३० डिसेंबर – शुक्रवार – यू कियांग नंगवाह – मेघालय
- ३१ डिसेंबर – शनिवार – मिझोराममध्ये बॅंका बंद