आफताबपासून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार 2020 सालीच श्रद्धा वालकरने केली होती. आफताबने गळा दाबून हत्या करण्याची धमकी दिल्याचे तिने या तक्रारीत म्हटले होते. आफताबच्या कुटुंबियांना या संपूर्ण प्रकरणाची कल्पना होती, असा उल्लेखदेखील श्रद्धाने आपल्या तक्रारीत केला होता. वसईच्या तुळींज पोलीस स्टेशनमध्ये तिने ही तक्रार केली होती. दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने व्यक्त केलेली भीती खरी ठरली. तिने दाखल केलेल्या तक्ररीचे पत्र हिंदुस्थान पोस्टच्या हाती लागले आहे.
गळा दाबून, तुकडे करण्याची दिली होती धमकी
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2020 ला श्रद्धाने वसईच्या तुळींज पोलीस स्टेशनमध्ये आफताब विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार, श्रद्धाने आफताबच्या मारहाणीमुळे आपण गंभीर जखमी झाल्याचे म्हटले आहे. तसेच, त्याने आपल्याला गळा दाबून मारण्याची आणि तुकडे करण्याची धमकी दिल्याचेही तिने आपल्या तक्रारीत म्हटले होते. श्रद्धाने दिलेल्या तक्ररीच्या पत्रात असे म्हटले आहे की, या सर्व प्रकरणाबाबत आफताबच्या घरच्यांना संपूर्ण कल्पना आहे. ते विकेंडमध्ये त्याला भेटायला येतात. त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांना माहिती आहे, असे या पत्रात श्रद्धाने लिहिले आहे.
( हेही वाचा: एकविरा आईच्या दारी, हलाल मांसाची विक्री )
मागच्या सहा महिन्यांपासून होतोय छळ….
श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागच्या सहा महिन्यांपासून आफताब मला मारहाण करत आहे. लवकरच आम्ही लग्न करणार होतो. परंतु आता मला आफताबसोबत रहायचे नाही. तसेच, भविष्यात माझे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार आफताब असेल.
Join Our WhatsApp Community