राज्य परिवहन महामंडळांच्या बसस्थानके/डेपोंचे अत्याधुनिक बांधकाम करतानाच उर्वरित जागांचा खासगी विकासकामांतर्गत बीओटी तत्वावर विकास करण्याची योजना परिवहन विभागाने आखली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला गती देण्याचे निर्देश दिले असून, पहिल्या टप्प्यात 5 हजार 245 कोटी रुपयांची कमाई एसटीला होईल, असा अंदाज आहे.
साडेबारा हजार कोटी रुपयांच्या संचित तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर बूस्टर डोस देण्याच्या या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 24 बसस्थानकांचा विकास करण्याचे प्रस्तावित आहे. या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानक बांधून देतानाच उर्वरित जागेचा वापर विकासक हे निवासी व व्यावसायिक गाळे बांधण्यासाठी करतील.
( हेही वाचा: गुजरातमध्ये कुणाची येणार सत्ता? जाणून घ्या ओपिनियन पोल… )
पहिल्या टप्प्यात प्रस्तावित बसस्थानके
- मुंबई- बोरिवली राजेंद्रनगर, मुंबई सेंट्रल, बोरिवली नॅन्सी काॅलनी, कुर्ला, विद्याविहार, ठाणे, भिवंडी
- पुणे- शिवाजी नगर, स्वारगेट, पिंपरी चिंचवड, लोणावळा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली
- नाशिक- नाशिक महामार्ग, जळगाव सीबीए, जळगाव शहर, धुळे
- नागपूर आणि अमरावती- मोरभवन नागपूर, हिंगणा, अमरावती, अकोला