सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद पेट घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर बैठक घेतल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील गवे कर्नाटकात समावेश करण्यात येणार आहेत, असे विधान केल्यामुळे हा वाद आणखी पेटला आहे. यावर बोलताना भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सीमावादावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद ही पंडित जवाहरालाल नेहरू यांची देणं आहे. मात्र सीमावाद प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतने जरी ठराव केला असला तरी काहीही फरक पडणार नाही. निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार आहे. कर्नाटकमधील अनेक ग्रामपंचायती आहेत, ज्यांना महाराष्ट्रात यायचे आहे. मग त्यांचे काय?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
(हेही वाचा कुमारस्वामींचा सत्ता जिहाद! म्हणाले, पुन्हा सत्ता दिल्यास…)
म्हणून मध्यावधी निवडणुकांची चर्चा
काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकांबाबत वक्तव्य केले होते. संजय राऊत यांच्याप्रमाणेच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी देखील मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असे म्हटले होते. यावर बोलताना जे कार्यकर्ते शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना थांबवण्यासाठी मध्यावधी निवडणुकांचे लॉलीपॉप दिले जात असल्याचा खोचक टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
संजय राऊतांवर टीका
संजय राऊत यांची सुरक्षा कमी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तीची सिक्युरिटी ही रिव्हिव कमिटी ठरवत असते. त्यात राज्य सरकारचा कोणताही संबंध नसतो. आता संजय राऊत ओरड करत आहे, मात्र जेव्हा आमची सेक्युरिटी काढली तेव्हा हेच आम्हाला सामान्य ज्ञान देत होते. आता त्यांनी इतरांना सामान्य ज्ञान द्यावे असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
(हेही वाचा love jihad : उत्तर प्रदेशातील ‘आफताब’नेही हिंदू युवतीचे तुकडे शेतात पुरले, पण दोन वर्षांनी असे घडले…)
Join Our WhatsApp Community