ED च्या समन्सवर आता असणार क्यू-आर कोड; …म्हणून घ्यावा लागला हा निर्णय!

138

रंगनिर्मिती करणा-या निपाॅन कंपनीला ईडीच्या नावे बोगस समन्स पाठवत कंपनीकडून 20 कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर आता ईडीने आपल्या समन्सवर क्यू-आर कोड प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्यू-आर कोडमुळे ज्याच्या नावे समन्स आहे, अशा व्यक्तीला तो क्यू-आरकोड स्कॅन करुन त्याच्या समन्सची सत्यता पडताळून पाहता येईल.

यासंदर्भात ईडीने एक प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोगस समन्स जारी करत लोकांची लूटमार करणा-या एका टोळीचा ईडीच्या अधिका-यांनी नुकताच पर्दाफाश केला.

( हेही वाचा :Shraddha Walkar Murder Case: श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी व्यक्त केलेली ‘ती’ भीती ठरली खरी )

काय आहे क्यू-आर कोड प्रणाली?

  • क्यू-आर कोडच्या या प्रणालीनुसार, ईडीच्या कार्यालयातर्फे इलेक्ट्राॅनिक प्रणालीतून संबंधित व्यक्तीला समन्स पाठवले जाईल.
  • समन्सवर एक विशिष्ट पासकोड छापलेला असेल.
  • ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अथवा कंपनीला ईडीकडून समन्स प्राप्त होईल. त्यावेळी त्या समन्सवर असलेला बारकोड मोबाईल फोनमधील कॅमे-याच्या माध्यमातून बघितल्यास त्याद्वारे थेट ईडीच्या वेबसाईटची लिंक ओपन होईल.
  • ही लिंक ओपन झाल्यावर समन्सवर छापलेला पासकोड तिथे टाकल्यास संबंधित व्यक्तीला आपल्या समन्सचे पूर्ण तपशील तेथे समजतील.
  • ईडीकडून यापुढे प्रत्येक समन्सवर हा क्यू-आर कोड असेल.
  • क्यू-आर कोडशिवाय आलेले समन्स हे अधिकृत नसेल, असेही ईडीने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.