केंद्र सरकार दर महिन्याला देते 16 लाख जणांना रोजगार, रेल्वेमंत्र्यांची माहिती

178

केंद्र सरकारकडून दर महिन्याला 16 लाखांपर्यंत नोकरभरती होत असल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. अजमेर येथे सीआरपीएफने आयोजित केलेल्या एका रोजगार मेळाव्यात रेल्वेमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पीटीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दर महिन्याला 16 लाख रोजगार

केंद्र सरकारकडून दर महिन्याला 16 लाख लोकांना पारदर्शकरित्या नोक-या दिल्या जात आहेत. जगावर आर्थिक संकट कोसळलं असतानाही भारत हा संधींनी युक्त असा ऊर्जेचा स्त्रोत म्हणून उदयास आला आहे. मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे देशातील प्रत्येक वर्गाचे जीवन सोयीस्कर झाले असल्याचेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः …मग ‘या’ लोकांनी आयकर का भरावा?, उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला थेट सवाल)

तरुणांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र 

तसेच तरुणांनी ‘नेशन फर्स्ट,ऑलवेज फर्स्ट’ हा मंत्र अंगिकारण्याचे आवाहन केले आहे. ज्या लोकांनी नेहमीच आपल्या कर्तव्यात देशाला पहिले स्थान दिले त्यांनाच आयुष्यात कायम विजय प्राप्त झाला आहे. या रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या अनेकांना नियुक्ती पत्रे देखील देण्यात आली आहेत.

(हेही वाचाः सर्वोच्च न्यायालयाचेही Online RTI Portal सुरू होणार, न्यायालयातील ‘ही’ माहिती घरबसल्या मिळणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.