ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ONGC ने 64 अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ही भरती वेगवेगळ्या ट्रेंडमध्ये केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ongcindia.com या ONGC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचनेतून त्यांची पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची अंतिम तारीख तपासावी, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. या OAGC भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2022 आहे.
कोणाला करता येणार अर्ज
अतिरिक्त पात्रतेसह ITI/पदवीसह विशिष्ट शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या पदांसाठी सचिवीय सहाय्यक, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), इलेक्ट्रीशियन, फिटर, मशीनिस्ट, ऑफिस असिस्टंट, अकाउंटंट आणि इतर यासह विविध पदांसाठी अर्ज करू शकतात.
या रिक्त जागी होणार भरती
- सचिवीय सहाय्यक – 05
- संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग – 05
- इलेक्ट्रिशियन – 09
- फिटर – 07
- मशिनिस्ट – 03
- कार्यालय सहाय्यक-14
- लेखापाल – 07
- वेल्डर-03
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 03
- प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) – 02
- रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक – 02
- वायरमन – 02
- प्लंबर – 02
दरमहा मिळणार प्रशिक्षणार्थी श्रेणी पात्रता स्टायपेंड
- पदवीधर शिकाऊ बी.ए./ बी.कॉम/ बीएससी/ बीबीए – रु. 9000 प्रति महिना
- ट्रेड अप्रेंटिस एक वर्ष ITI – 7700 प्रति महिना
- दोन वर्षे ITI रु – 8,050 रुपये प्रति महिना
- डिप्लोमा अप्रेंटिस डिप्लोमा – रु 8,000 प्रति महिना