WhatsApp वर मिळणार आता पूर्ण प्रायव्हसी, लवकरच लॉंच होणार ‘हे’ नवं फीचर!

195

लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप त्याच्या डेस्कटॉप अॅपसाठी एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने युजर्सना मोठ्या स्क्रीनवर चॅट करताना आता प्रायव्हसी मिळणार आहे. या फीचरला स्क्रीन लॉक असे नाव देण्यात आले असून ते नवीन प्रायव्हसी लेयर म्हणून डेस्कटॉपसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा एक भाग बनणार आहे. यासह व्हॉट्सअपच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. या फीचरमुळे तुमच्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅपमध्ये इतर कोणालाही अनधिकृत प्रवेश करता येणार नाही.

(हेही वाचा – UIDAI चा मोठा आदेश! बाल आधार कार्डमध्ये आता ‘हे’ काम करणं असणार बंधनकारक)

व्हॉट्सअॅप सध्या Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर पासवर्ड-इनेबल्ड ऐक्सेसचा पर्याय देते. म्हणजेच, अॅप उघडण्यासाठी युजर्सना पिन टाकावा लागतो. व्हॉट्सअॅप फॉर डेस्कटॉप अॅपमध्ये असे सुरक्षा फीचर अद्याप देण्यात आले नव्हते. मात्र आता ही कमी देखील व्हॉट्सअप या नवीन अपडेटद्वारे भरून काढणार आहे. WebtaInfo च्या अहवालानुसार, हे फिचर अजून विकसित होत असल्याने ते कधी प्रत्यक्ष वापरात येईल हे आताच सांगता येणार नाही.

हे फीचर डेव्हलपमेंट मोडमध्ये

WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅप डेस्कटॉप अॅपसाठी एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यानंतर युजर्स सिस्टममधून बाहेर गेल्यानंतर स्क्रीन लॉक होईल आणि पिन किंवा पासवर्ड टाकल्यानंतरच व्हॉट्सअॅपवर ऐक्सेस मिळेल. नवीन फीचर अद्याप डेव्हलपमेंट मोडमध्ये आहे.

असं आहे नवं फीचर

  1. प्रत्येक वेळी युजर्सला व्हॉट्सअप उघडताना पासवर्ड टाकणे आवश्यक असणार आहे.
  2. तुम्ही तुमचा पीसी इतरांहर शेअर करतात तेव्हा हे फीचर तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. हे फीचर ऑप्शनल असणार आहे. शिवाय तुम्हाला कधी पासवर्ड सुरू ठेवायचा कधी नाही हे युजर्ससाठी ऐच्छिक असणार असून त्याच्या नियंत्रणात ते असणार आहे.
  3. हा पासवर्ड व्हॉट्सअपसह शेअर केला जाणार नाही. तो तुमच्यापुरता मर्यादित राहिल. जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर अॅपमधून लॉग आऊट करावे लागेल.
  4. तुमच्या डिव्हाइसला क्यूआर कोडशी लिंक करून व्हॉट्सअप पुन्हा लॉगइन करावे लागणार आहे. या नव्या फीचरमध्ये तुम्हाला फिंगर प्रिंट सेंसरपण लवकरच मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.