महिलांना आपल्या मासिक पाळीच्या दिवसांत सॅनिटरी पॅड्सची आवश्यकता असते. त्यामुळे सॅनिटरी पॅड्स हे भारतात सर्वाधिक विकले जाणारे उत्पादन आहे. पण भारतात विकल्या जाणा-या सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे महिलांना कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे महिलांनी याबाबत सावध असणं आवश्यक आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजारांची शक्यता
टॉक्सिक लिंक्स नावाच्या एका एजीओने केलेल्या अभ्यासानुसार ही माहिती मिळत आहे. भारतात दर चार महिलांच्या मागे तीन महिला या सॅनिटरी पॅड्स वापरतात. या पॅड्समध्ये कार्सिनोजेन,रिप्रोडक्टिव्ह टॉक्सिन्स,एन्डोक्राइन डिसरप्टर्स आणि अॅलर्जेन्स यांसारखी विषारी रसायने असतात, जी महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असून त्यांच्यामध्ये कर्करोगासारखे गंभीर आजार निर्माण करण्याची क्षमता आहे.
(हेही वाचाः टाटा आता बिसलेरीला देखील विकत घेणार, लवकरच होणार अधिकृत करार)
सॅनिटरी पॅड्सचा सर्वाधिक वापर
टॉक्सिक लिंकद्वारे करण्यात आलेल्या या अभ्यासात दहा सॅनिटरी पॅड ब्रँड्सची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये काही अस्थिर सेंद्रिय संयुगे आढळून आली. हे सर्व सॅनिटरी पॅड ब्रँड्स देशभरात उपलब्ध आहेत. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालात असे दिसून आले आहे की, भारतातील 15 ते 24 वयोगटातील सुमारे 64 टक्के महिला सॅनिटरी पॅड वापरतात, ज्यामुळे हा एक चिंताजनक अभ्यास आहे.
Join Our WhatsApp Community