लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू तरुणी श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आफताबच्या क्रूर कृत्याचा देशभरातून निषेध होऊ लागला आहे. यावरून आता राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
काय म्हणाले अमित शाह?
आफताबने या प्रकरणी न्यायालयात ‘हा गुन्हा आपल्याकडून त्यावेळी संतापाच्या भरात झाला. आपण पोलिसांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करत आहोत’, असे सांगितले होते. यानंतर आता आफताबच्या कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्यात आली. तसेच आफताबच्या लाय डिटेक्टर-पॉलीग्राफ टेस्ट परवानगी देण्यात आली आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री आणि अमित शाह यांनीही यावर भाष्य केले आहे. दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष म्हणजेच सरकारी पक्ष श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्याला कठोर शिक्षा देईल. ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष (सरकारी पक्ष) नक्की घेईल’, असे अमित शाहांनी म्हटले आहे.
(हेही वाचा ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून सुषमा अंधारेंनी म्हटले ‘बिस्मिल्ला ए रेहमान ए रहीम…’ )
Join Our WhatsApp Community