पृथ्वीराज चव्हाण यांनी टोचले राहुल गांधींचे कान, म्हणाले सावरकर क्रांतिकारक, लेखक, चांगले कवी होते!

160

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन वीर सावरकर यांचा अवमान केला, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. आता राहुल गांधी यांचे कान खुद्द काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टोचले आहेत. वीर सावरकर क्रांतीवीर होते. चांगले लेखक, कवी होते. त्या व्यक्तीचे मूल्यमापन करणारा तुलनात्मक घेतले पाहिजे. राहुल गांधींनी केवळ एक बाजू मांडली. पुरावे दाखवले. त्यावरून वाद निर्माण झाला. ऐतिहासिक पुरुषांकडे पाहताना सर्व दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे, अशा शब्दात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावले.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सावरकरांनी भारताच्या १८५७च्या युद्धाबद्दल एक भूमिका मांडली होती. ते शिपयांचे बंड नव्हते तर स्वातंत्र्ययुद्ध होते असे पुस्तक लिहिले होते, तेव्हा इंग्रजांनी त्यांच्यावर खटला दाखल केला. पॅरिसमधून त्यांना अटक केली. मग त्यांना भारतात आणताना जहाजातून समुद्रात उडी मारली होती. हे खरे आहे. ते क्रांतिकारक होते, लेखक होते. त्यांच्या सगळ्या मतांवर सहमत होऊ शकत नाही, परंतु वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यांनी १० वर्षे शिक्षा भोगली. वयाच्या ३८ व्या वर्षांपर्यंत ते शिक्षा भोगत होते. कुणालाही कल्पना करता येणार नाही इतकी क्रूर ती शिक्षा होती. १० वर्षांनंतर त्यांची मानसिकता मोडली. तिथून पुढे दुसरा टप्पा सुरू होतो. त्यावर राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केली, पण सावरकर हे क्रांतीवीर होते हे माझे मत आहे, इंदिरा गांधी यांनी १९६६ साली सावरकरांवर स्टॅम्प काढला होता. देशद्रोही असते तर इंदिरा गांधींना इतिहास माहिती नव्हता का? सावरकर गेले तेव्हाही इंदिरा गांधींनी पत्र लिहिले होते, १० वर्षे जेलमध्ये भोगून सावरकरांना ब्रिटीशांनी सोडले, त्यानंतर ते रत्नागिरीत राहत होते. इंग्रजांकडून मानधन मिळत होते. हिंदू धर्मातील विकृतीवर त्यांनी चांगली भूमिका मांडली. गाय उपयोगी पशु आहे. मांसाहाराचा पुरस्कारही केला. लिखाणात वेगवेगळ्या गोष्टी आहे असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.

(हेही वाचा रिचाने नवरा केला अली, तिची बुद्धी भ्रष्ट झाली…केला भारतीय सैनिकांचा अवमान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.