सायबर पोलिसांची कारवाई; वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणा-यांना अटक

160

तुम्ही भरलेले वीज बिल सिस्टमध्ये अपडेट झालेले नाही, त्यामुळे तुमचे वीज कनेक्शन बंद करण्यात येईल, असा मेसेज जर तुम्हाला आला तर वेळीच सावध व्हा. कारण अशा मेसेजच्या माध्यामातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

वीज बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणा-या दोन भामट्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तुम्ही मागच्या महिन्यात वीज बिल भरले आहे. परंतु ते सिस्टमला अपडेट झाले नसल्याने तुमची लाईट कट करण्यात येईल, असे सांगून या दोघांनी अनेकांची फसवणूक केली होती. मुंबईच्या वांद्रे बीकेसी सायबर पोलिसांनी या दोघांना झारखंड इथून अटक केली. सचिनकुमार भरत मंडल आणि संजितकुमार सिताराम मंडल अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

( हेही वाचा: कल्याणमधील इमारतीत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी साडेआठ तासांचा थरार )

तक्रारदाराच्या खात्यातून 55 हजार गायब

सुधीर भानुदास माने असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सुधीर भानुदास माने यांच्या मोबाईल क्रमांकावर वीज बिलासंदर्भात मेसेज आला. तुमचे वीज बिल अपडेट नसल्यामुळे वीज कट करण्यात येईल, असा मेसेज सुधीर माने यांना 17 नोव्हेंबर रोजी आला होता. सोबतच यात मोबाईल क्रमांकही दिला होता. घाबरलेल्या माने यांनी तत्काळ मेसेजमधील मोबाईल क्रमांकावर काॅल केला. त्यावेळी समोरच्या व्यक्तीने तुमचे बिल ऑनलाईन अपडेट करत असल्याचे सांगून त्यांना दहा रुपयांची पेमेंट लिंक पाठवून त्यावर पेमेंट करण्यास सांगितले. सुधीर माने यांनी पेमेंट करताच आरोपींनी त्यांचे बॅंक डिटेल्स मिळवले आणि खात्यातून 55 हजार रुपये काढले. बॅंकेतून तब्बल 55 हजार रुपये डेबिट झाल्याचे कळताच माने यांनी त्या व्यक्तीला फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुधीर माने यांनी तातडीने वांद्रेमधील बीकेसी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.