अंबरनाथमध्ये एक अत्यंत दुदैवी प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबरनाथमधील उलन चाळ परिसरात ही घटना घडली. खेळता खेळता 6 महिन्यांच्या बाळाने आपल्या तोंडात मासा टाकला आणि त्याचा श्वास अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
(हेही वाचा – राज ठाकरे 29 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर, मनसैनिकांना कोणता कानमंत्र देणार?)
काय घडला नेमका प्रकार
सरफराज अन्सारी या नावाचे कुटुंब अंबरनाथच्या उलन चाळ परिसरात राहण्यास आहे. त्यांना शहबाज नावाचा ६ महिन्याचा मुलगा होता. गुरूवारी रात्रीच्यावेळी शहबाज हा इतर काही मुलांसह घराबाहेर खेळत होता. खेळता-खेळता तो अचनाक मोठ्याने रडू लागला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी शहबाजच्या घरी सांगितले. यानंतर शहबाजची आई आणि वडिलांनी शहबाज खेळत असलेल्या ठिकाणी धाव घेतली. मात्र त्याला जवळ घेतल्यानंतरही तो शांत बसत नव्हता. शहबाजच्या आई वडिलांनी एक खासगी रूग्णालय गाठले. पण तिथल्या डॉक्टरांना शहबाजला नेमकं काय झाले हे लक्षात येत नव्हते. त्यामुळे त्याला घेऊन आई-वडिलांनी उल्हासनगरचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय गाठले. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच शहबाज याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
डॉक्टर काय म्हणाले…
शहबाजला डॉक्टरांनी तपासले असता त्याच्या घशात मासा अडकल्याने त्याचा श्वास रोखला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हा मासा डॉक्टरांनी त्याच्या घशातून बाहेर काढला. यानंतर शुक्रवारी सकाळी या बाळाचे शवविच्छेदन करून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न शासकीय मध्यवर्ती रूग्णालयाच्या डॉक्टरांकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community