विदर्भ आणि मराठवाड्यातील स्टील उद्योगांचे कंबरडे मोडल्यामुळे आता तेथील उद्योग एकामागोमाग एक बंद पडत आहेत. उद्योगांना मिळणारी सवलत बंद झाल्यामुळे त्याचा फटका या उद्योगांना बसला आहे. यामुळे काही उद्योगांनी राज्यातून आपला गाशा देखील गुंडाळला आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचा-यांच्या रोजगार आणि राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे.
सवलत बंद झाल्याचा विपरित परिणाम
वीजेवर मिळणारे अनुदान बंद झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योग चांगलेच अडचणीत आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे काही उद्योग हे बंद पडत असून, काही उद्योगांनी आपले उत्पादन कमी केले आहे. याचा परिणाम म्हणून या कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली आहे. लोह-पोलाद उद्योग विदर्भ आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पण आता हेच उद्योग बंद झाल्यामुळे औद्योगिकीकरणावर मोठा परिणाम झाला आहे.
(हेही वाचाः रेल्वेची मोठी कारवाई, गेल्या 16 महिन्यांत इतक्या अधिकारी व कर्मचा-यांची हकालपट्टी)
इतक्या उद्योगांवर परिणाम
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने वीज सवलत बंद झाल्यामुळे उद्योगांवर होणा-या विपरित परिणामांकडे लक्ष वेधले आहे. विदर्भ आणि मराठवाडा विभागातील डी आणि डी प्लेस क्षेत्रातील 6 उद्योगांनी उत्पादनात लक्षणीय घट केली असून 10 औद्योगिक समूहांनी राज्यातून काढता पाय घेतला आहे. इतकंच नाही तर तब्बल 36 उद्योगांनी टाळेच लावले असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community