shraddha murder case : महाविकास आघाडी सरकारच्या आरोपावर उत्तर देण्यास उद्धव ठाकरेंनी का टाळले?

138

अवघ्या देशात खळबळ उडवून देणारे श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये दोन दिवसांपूर्वी धक्कादायक खुलासा समोर आला. श्रद्धाने महाविकास आघाडीचे सरकार असताना २०२० साली पोलिसांना तक्रार देऊन तिची आफताब हत्या करणार आहे, असे सांगितले होते. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप होत आहे. या विषयी पत्रकारांनी जेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत उत्तर देणे टाळले, सकृत दर्शनी ठाकरे उत्तर देण्याचे टाळत असले तरी त्यामागे कोण आहे, याचा खुलासा भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

कुणामुळे उद्धव ठाकरे गप्प राहिले? 

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बाजूला बसलेले संजय राऊत हे दोघे पत्रकार परिषद घेत असल्याचा व्हिडीओ अतुल भातखळकर यांनी ट्विट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये पत्रकारांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी श्रद्धा वालकर हिच्या हत्येला महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे, कारण जेव्हा श्रद्धाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसात तक्रार केली होती, तेव्हा त्याची दखल घेण्यात आली नाही, असे म्हटले जात आहे’, अशी विचारणा केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसलेले संजय राऊत यांनी ‘सोडून द्या’, असे म्हटले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘हा विषय मोठा आहे, त्यावर आता बोलणे शक्य नाही’, असे म्हणाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

(हेही वाचा रिचा चड्डाच्या देशविरोधी वक्तव्याचे काँग्रेस नेत्या अभिनेत्री नगमाकडून समर्थन)

काय म्हणाले अतुल भातखळकर? 

हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल करताना अतुल भातखळकर त्यात म्हटले की, ‘पत्रकारांनी श्रद्धा वालकरबद्दल प्रश्न विचारले असता बाजूचा जामिनावर सुटलेला, दोन मुलींचा चोंबडा बाप सल्ला देतोय ‘सोडून द्या’…आणि ज्वलंत हिंदुत्ववादी मर्द उद्धवजीनी उत्तर द्यायचे टाळले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.