जगातील सर्वात महागड्या औषधाला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेच्या फेडरल ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन(FDA)ने हेमजेनिक्स या औषधाला परवानगी दिली असून, या औषधाची किंमत तब्बल 3.5 मिलियन डॉलर म्हणजेच 28.51 कोटी रुपये इतकी आहे. हे जगातील आतापर्यंतचे सर्वात महागडे औषध आहे.
दुर्मिळ अशा आजारावर प्रभावी औषध
हिमोफिलिया बी या अत्यंत दुर्मिळ अशा आजारासाठी हेमजेनिक्स हे औषध तयार करण्यात आले आहे. हा एक आनुवांशिक आजाराचा प्रकार असून यामध्ये मानवी शरीरातील रक्त कमी झाल्याचे आढळून येते. या गंभीर अशा आजारावर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या औषधासाठी कठोर परिश्रम आणि प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या औषधाची किंमत ही अगदी रास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः मलेरियावरचं औषध बनवणारी कंपनी ते पिण्याच्या पाण्याचा Brand, Bisleriचा इतिहासच Grand)
पुरुष या आजाराने जास्त बाधित
हिमोफिलिया बी या आजारामुळे माणसाच्या शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया किंवा गती कमी होते, त्यामुळे माणसाला इजा झाल्यास त्याच्या शरीरातून होणारा रक्तस्त्राव थांबू शकत नाही. पुरुषांना या आजाराचा जास्त त्रास होतो. अमेरिकेत जवळपास 8 हजार पुरुष या आजाराने बाधित आहेत. या आजारावर मात करणे कठीण असल्यामुळे या महागड्या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community