Provident Fund(PF)हा संघटित क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी भविष्याची जमापुंजी आहे. यासाठी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO मध्ये खाते असलेल्या सर्वांना पीएफचा लाभ देण्यात येतो. या खात्यात तुमच्या मूळ पगारातून काही प्रमाणात कापलेले पैसे जमा होतात. या कापलेल्या पैशांतून, निवृत्तीनंतर तुम्हाला किती पैसे मिळू शकतात, याबाबत आपण जाणून घेऊया.
मूळ पगाराच्या 12 टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात येते. हे पैसे गरजेसाठी काही कर्मचा-यांकडून काढण्यात देखील येतात. पण हे पैसे जर निवृत्तीपर्यंत एकदाही काढले नाहीत तर त्याचा फार मोठा फायदा निवृत्तीनंतर होऊ शकतो. तसेच निवृत्तीनंतर मिळणारे पैसे हे पुरेसे नाहीत असे वाटत असेल तर आपल्याला पीएफमधील योगदानही वाढवता येते.
(हेही वाचाः सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? ‘ही’ सोपी ट्रिक वापरा आणि ओळखा)
कसा मिळतो निवृत्तीनंतर निधी?
प्रत्येक कर्मचा-याच्या बेसिक सॅलरी+ डीएच्या 12 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. मूळ वेतन + डीएमध्ये कंपनीचे योगदान 12 टक्के आहे. दोन निधी एकत्र करुन जमा झालेल्या पैशावर व्याज देण्यात येते. दरवर्षी व्याजाचा आढावा घेण्यात येतो, पण याचा फायदा म्हणजे चक्रवाढ व्याजामुळे व्याजात मिळणारा फायदा दुहेरी होतो. त्यामुळे जर वयाच्या 25 वर्षी तुमचा मूळ पगार(Basic Salary) 10 हजार रुपये असेल तर, पीएफ व्याजदर(सध्याचा)- 8.1% आणि वार्षिक पगारवाढ 10 टक्के मिळून 58 व्या वर्षी निवृत्तीच्या वेळी तुमचा एकूण फंड 1.22 कोटी रुपये होईल.
- समजा, बेसिक सॅलरी- 14 हजार रुपये
- निवृत्तीचे वय- 58 वर्षे
- मासिक योगदान- मूळ पगाराच्या 12 टक्के
- नियोक्त्याकडून मिळणारं मासिक योगदान- 3.67 टक्के
- पीएफवरील व्याजाचा सध्याचा दर- 8.1 टक्के
- पगारातील वार्षिक वाढ- 10 टक्के
- सेवानिवृत्तीनंतर मिळणारा निधी- 2 कोटी 40 लाख 72 हजार 613 रुपये
(हेही वाचा: 500 आणि 1000 च्या जु्न्या नोटा पुन्हा बदलता येणार, काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)
Join Our WhatsApp Community