मुंबई महापालिकेच्या पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवारी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवारी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे अंधेरी जोगेश्वरी पूर्व (के/पूर्व), वांद्रे ते सातांक्रुझ पूर्व (एच/पूर्व), वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम (एच/पश्चिम), गोरेगाव (पी/दक्षिण), भांडुप, कांजूर, विक्रोळी (एस), कुर्ला (एल) आणि घाटकोपर विद्याविहार (एन) या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच अंधेरी जोगेश्वरी पश्चिम (के/पश्चिम) विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित म्हणजे बंद राहील. अंधेरी जोगेश्वरी पूर्व (के/पूर्व), माहिम,दादर व धारावी (जी/उत्तर), गोरेगाव (पी/दक्षिण) विभागातील काही परिसरात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे
( हेही वाचा : सरकारी रुग्णालयांत रुग्णसेवा खोळंबणार; परिचारिका संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा)
वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम (एच/पश्चिम) विभागातील काही परिसरात २९ नोव्हेंबरला पाणीपुरवठा कमी कालावधीसाठी होईल व काही परिसरात ३० नोव्हेंबरला पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
Join Our WhatsApp Community