गोवरच्या संसर्गाने शुक्रवारी ८ नव्या रुग्णांचे निदान झाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. जी-दक्षिण, एल, एन या विभागांत प्रत्येकी एक तर आर-दक्षिण विभागांत २ तसेच पी-उत्तर येथे तीन रुग्णांना गोवरची बाधा झाल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. मुंबईत आतापर्यंत २८० जणांना गोवरची बाधा झाली आहे.
( हेही वाचा : सरकारी रुग्णालयांत रुग्णसेवा खोळंबणार; परिचारिका संघटनेचा बेमुदत संपाचा इशारा )
सध्या मुंबईत शरीरात ताप आणि पूरळ दिसून आलेले ३ हजार ८३१ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. गोवंडी, कुर्ला खालोखाल पी-उत्तर विभागात २२, एफ-उत्तर विभागांत १३ रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. तर आतापर्यंत ९ नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यांत मुंबईत १३ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी ८ मृत्यू हे मुंबईत तर मुंबईबाहेरील ३ मृत्यू आहेत. तर २ गोवरचे मृत्यू संशयित असून अद्यापही त्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
- २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत ताप व शरीरावर पूरळ दिसून आलेले रुग्ण – १३६
- एकूण संशयित रुग्ण – ३ हजार ८३१
- रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण – ३१
- डिस्चार्ज झालेले रुग्ण – २८
- व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण – ३